महाराष्ट्र पोलीस न्यूज | प्रतिनिधी नेटवर्क
🆔 ओळखपत्र पडताळणी
महाराष्ट्र पोलीस न्यूज नेटवर्क
Central Press Journalist Association
Central Press
Journalist Association
महाराष्ट्र पोलीस न्यूज

महाराष्ट्र पोलीस न्यूज

MAHARASHTRA POLICE NEWS
AFFILIATED WITH CENTRAL PRESS JOURNALIST ASSOCIATION
Central Press Journalist Association
संलग्न संस्था Central Press
Journalist Association
Subscribe Channel
ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र पोलीस विभागाशी संबंधित ताजी घडामोड, क्राईम रिपोर्ट आणि प्रशासकीय अपडेट्स...

जोगेश्वरीत चाकू-बॅट घेऊन दहशत; फरार आरोपीला मेघवाडी पोलिसांकडून अटक

Thursday, August 27, 2026 Maharashtra Police News Central Press Journalist Association Affiliated
बातमी ऐका (Audio News)
शेअर करा: Facebook 𝕏

महाराष्ट्र पोलीस न्यूज

MAHARASHTRA POLICE NEWS

© महाराष्ट्र पोलीस न्यूज
जोगेश्वरीत चाकू-बॅट घेऊन दहशत; फरार आरोपीला मेघवाडी पोलिसांकडून अटक
वार्ताहर : संदिप कसालकर | मुंबई मुंबई : जोगेश्वरी पूर्वेतील ईदगाह मैदान परिसरात चाकू आणि बेसबॉल बॅटचा धाक दाखवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी ......
👉 संपूर्ण बातमी सविस्तर वाचण्यासाठी भेट द्या: www.maharashtrapolicenews.com
बातमीदार: Maharashtra Police News Thursday, August 27, 2026

वार्ताहर : संदिप कसालकर | मुंबई

मुंबई : जोगेश्वरी पूर्वेतील ईदगाह मैदान परिसरात चाकू आणि बेसबॉल बॅटचा धाक दाखवत दहशत निर्माण केल्याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी एका ३० वर्षीय आरोपीला अटक केली आहे. शमशाद शेख उर्फ भंगारवाला असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पोलिसांना चकवा देत ठिकाणे बदलत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जुन्या वादातून मारहाण आणि धमकी

पोलिसांच्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी पूर्व येथील ईदगाह मैदान परिसरात ही घटना घडली. जुन्या वादातून आरोपीने फिर्यादी अदनान इरफान शेख आणि त्यांच्या बहिणीला रस्त्यात अडवल्याचा आरोप आहे.

यावेळी आरोपीने मारहाण करत हातातील चाकू आणि बेसबॉल बॅट हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केली. तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.

घटनेनंतर मेघवाडी पोलीस ठाण्यात संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

ओळख लपवत पोलिसांना देत होता गुंगारा

गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने स्वतःची ओळख लपवत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केल्याचे तपासात समोर आले. आरोपीचा शोध घेण्यासाठी मेघवाडी पोलिसांचे विशेष पथक सक्रिय करण्यात आले होते.

दरम्यान, २३ ऑगस्ट २०२६ रोजी आरोपी प्रेमनगर परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचून शमशाद शेखला ताब्यात घेतले.

गुन्ह्यातील हत्यारे शोधण्याचे प्रयत्न

तपासादरम्यान आरोपीने कथित गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि बेसबॉल बॅट लपवून ठेवल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. ही हत्यारे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिग्राम, पोलीस निरीक्षक पवरे आणि पोलीस उपनिरीक्षक सुहास कादे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने आरोपीचा शोध घेतला.

या कारवाईत पोलीस हवालदार राजे ठाकूर, पोलीस शिपाई सुनील माने, अक्षय सातपुते, शुभम पाटील, संदीप शिरसाट, आकाश राठोड आणि शैलेश पवार यांनी सहभाग घेतला.

मेघवाडी पोलिसांच्या या कारवाईमुळे जोगेश्वरी परिसरात दहशत निर्माण करण्याचा आरोप असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांच्या ताब्यात आणण्यात यश आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मेघवाडी पोलीस करत आहेत.

महाराष्ट्र पोलीस न्यूज
अधिकृत वृत्त प्रतिनिधी
Maharashtra Police News
महाराष्ट्र पोलीस न्यूज नेटवर्क आणि Central Press Journalist Association अधिकृत प्रतिनिधी.
महाराष्ट्र पोलीस न्यूज
जिल्हा / तालुका प्रतिनिधी भरती

महाराष्ट्र पोलीस न्यूजचे अधिकृत प्रतिनिधी व्हा!

अधिकृत प्रेस ओळखपत्र व किटसह आपल्या भागातील घडामोडी राज्यभर पोहोचवा.

Press ID Card (सेंट्रल प्रेस जर्नलिस्ट होलोग्रामसह)
Official Lanyard & Car/Bike Stickers
वेबसाईटवर तुमच्या नावाने बातमी प्रसिद्धी
बातमी आवडल्यास नक्की शेअर करा: Facebook
विशेष नोंद
महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत! Central Press Journalist Association संलग्न अधिकृत पोर्टल महाराष्ट्र पोलीस दलाच्या सकारात्मक, धाडसी व उल्लेखनीय कामगिरीचे एकमेव व्यासपीठ! मुख्य संपादक: संदिप कासळकर | उपसंपादक: सलाहुद्दीन शेख महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत! Central Press Journalist Association संलग्न अधिकृत पोर्टल महाराष्ट्र पोलीस दलाच्या सकारात्मक, धाडसी व उल्लेखनीय कामगिरीचे एकमेव व्यासपीठ! मुख्य संपादक: संदिप कासळकर | उपसंपादक: सलाहुद्दीन शेख
ताज्या बातम्या