महाराष्ट्र पोलीस न्यूज
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सत्य, सुरक्षितता आणि निष्पक्ष बातमीदारी
महाराष्ट्र पोलीस न्यूज | प्रतिनिधी नेटवर्क
🆔 ओळखपत्र पडताळणी
महाराष्ट्र पोलीस न्यूज नेटवर्क
Central Press Journalist Association
Central Press
Journalist Association
महाराष्ट्र पोलीस न्यूज

महाराष्ट्र पोलीस न्यूज

MAHARASHTRA POLICE NEWS
AFFILIATED WITH CENTRAL PRESS JOURNALIST ASSOCIATION
Central Press Journalist Association
संलग्न संस्था Central Press
Journalist Association
Subscribe Channel
ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र पोलीस विभागाशी संबंधित ताजी घडामोड, क्राईम रिपोर्ट आणि प्रशासकीय अपडेट्स...
मुख्यपृष्ठ / Crime

स्कूटरवर आले, फोल्ड मोबाईल हिसकावला अन्...; वांद्रे क्राईम डिटेक्शन टीमने वडाळ्यातून आवळल्या मुसक्या!

Tuesday, September 22, 2026 Kasalkar Insights CPJA Affiliated
⏱ २ मिनिटांत वाचा
फॉन्ट:
बातमी ऐका (Audio News)
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!
शेअर करा: Facebook 𝕏


विशेष रिपोर्ट: संदिप कसालकर

मुंबई: वांद्रे पश्चिम परिसरात एका ज्येष्ठ महिलेला रस्त्यात अडवून जबरी चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात वांद्रे पोलिसांना मोठे यश आले आहे. गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्याने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे अवघ्या काही तासांत या गुन्ह्याची उकल करत ४ आरोपींना जेरबंद केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली महागडी स्कूटर आणि चोरीस गेलेला सॅमसंग फोल्ड मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय घडली?
वांद्रे पश्चिम येथील सेंट पीटर्स रोड परिसरातील रहिवासी असलेल्या ६२ वर्षीय हेअर स्टायलिस्ट अग्नेटा रॉड्रिक्स या १४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ५.२० वाजताच्या सुमारास कार्टर रोड येथे आपल्या ग्राहकाचे काम करण्यासाठी पायी जात होत्या. त्या मॅन्युअल गोंडसॉल्विस रोड, सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल गेट नं. १ समोरील कृपा व्ह्यू बिल्डिंगजवळ पोहोचल्या असता, अचानक पाठीमागून आलेल्या दोन मोटर स्कूटरवरील अज्ञात इसमांनी त्यांच्यावर झडप घातली. फिर्यादीच्या हातातील महागडी लेडीज हॅन्डबॅग आणि त्यातील सॅमसंग फोल्ड-६ मोबाईल जबरदस्तीने हिसकावून आरोपींनी पळ काढला.

या घटनेनंतर फिर्यादीच्या तक्रारीवरून वांद्रे पोलीस ठाण्यात गु.र. क्र. १९२४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३१०(२), ३०९(४), ६१(२), ३(५) अन्वये दरोडा आणि जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अटक आरोपींची नावे:
  1. आहात अब्दुल हसन खान (वय २१ वर्ष, रा. रूम नं. ५०३, बेस्ट चाळ, भारतीय कमला नगर, हनुमान मंदिराजवळ, वडाळा पूर्व, मुंबई-३७)

  2. जैनुद्दीन शहाबुद्दीन खान (वय २३ वर्ष, रा. रूम नं. ३०७, जिजाई अंगण सोसायटी, फेज-१, तळोजा, नवी मुंबई-१०)

  3. अरमान अहमद शेख (वय १९ वर्ष, रा. रूम नं. ५०६, बेस्ट चाळ, भारतीय कमला नगर, हनुमान मंदिराजवळ, वडाळा पूर्व, मुंबई-३७)

  4. इरफान शमीम खान (वय १९ वर्ष, रा. बेस्ट चाळ, भारतीय कमला नगर, सॉल्ट पेन रोड, वडाळा पूर्व, मुंबई-३७)

(या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आणखी एका फरार साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत.)

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
  1. सॅमसंग फोल्ड-६ स्मार्टफोन: अंदाजे किंमत ₹ ५०,०००/-
  2. गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमन स्कूटर (MH-01-FC-7251): अंदाजे किंमत ₹ १,००,०००/-
    गुन्हे प्रकटीकरण पथकाचा तपास व कारवाई:
गुन्हा दाखल होताच वांद्रे पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माग काढला. या गुन्ह्यात दोन स्कूटर्सवरून एकूण ५ आरोपी आल्याचे निष्पन्न झाले. गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून वडाळा आणि नवी मुंबई परिसरातून ४ आरोपींना ताब्यात घेतले.

कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार:
तपास अधिकारी: सपोनि राजेंद्र नागरे
तपासी पथक प्रमुख: सपोनि यश पालवे, सपोनि राजेंद्र नागरे

गुन्हे प्रकटीकरण पथक (Detection Staff):

पोह/०३११६६ माने
पोह/०८१३६० वाणी

पोह/०८१७०१ भोगले

पोह/०१९०२ पाटील

पोह/०८१६८६ साबळे

पोह/०९०३५५ सागवे

पोह/०९०१३३ गुरव

पोशि/०९०७६९ रकटे

पोशि/१४१९१४ पाटील

पोशि/११३३७६ सावंत

पोशि/०९२०३७ पवार
 पोशि/११२९९६ गोराडे

मार्गदर्शन:
  • सदरची धडक कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग), मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ-९), मा. सहायक पोलीस आयुक्त (वांद्रे विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे व पोलीस निरीक्षक (गुन्हे), वांद्रे पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
महाराष्ट्र पोलीस न्यूज हे सेंट्रल प्रेस जर्नालिस्ट असोसिएशन मध्ये संलग्न आहे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
अधिकृत वृत्त प्रतिनिधी
Kasalkar Insights
महाराष्ट्र पोलीस न्यूज नेटवर्क आणि Central Press Journalist Association अधिकृत प्रतिनिधी.
बातमी आवडल्यास नक्की शेअर करा: Facebook
विशेष नोंद
महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत! Central Press Journalist Association संलग्न अधिकृत पोर्टल महाराष्ट्र पोलीस दलाच्या सकारात्मक, धाडसी व उल्लेखनीय कामगिरीचे एकमेव व्यासपीठ! मुख्य संपादक: संदिप कासळकर | उपसंपादक: सलाहुद्दीन शेख महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत! Central Press Journalist Association संलग्न अधिकृत पोर्टल महाराष्ट्र पोलीस दलाच्या सकारात्मक, धाडसी व उल्लेखनीय कामगिरीचे एकमेव व्यासपीठ! मुख्य संपादक: संदिप कासळकर | उपसंपादक: सलाहुद्दीन शेख
ताज्या बातम्या
लिंक कॉपी झाली!