महाराष्ट्र पोलीस न्यूज
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सत्य, सुरक्षितता आणि निष्पक्ष बातमीदारी
महाराष्ट्र पोलीस न्यूज | प्रतिनिधी नेटवर्क
🆔 ओळखपत्र पडताळणी
महाराष्ट्र पोलीस न्यूज नेटवर्क
Central Press Journalist Association
Central Press
Journalist Association
महाराष्ट्र पोलीस न्यूज

महाराष्ट्र पोलीस न्यूज

MAHARASHTRA POLICE NEWS
AFFILIATED WITH CENTRAL PRESS JOURNALIST ASSOCIATION
Central Press Journalist Association
संलग्न संस्था Central Press
Journalist Association
Subscribe Channel
ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र पोलीस विभागाशी संबंधित ताजी घडामोड, क्राईम रिपोर्ट आणि प्रशासकीय अपडेट्स...
मुख्यपृष्ठ / Breaking News

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात तीन आरोपींना अटक..

Tuesday, October 20, 2026 avdhoot13 CPJA Affiliated
⏱ २ मिनिटांत वाचा
फॉन्ट:
बातमी ऐका (Audio News)
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!
शेअर करा: Facebook 𝕏
प्रतिनिधी: अवधुत सावंत

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफ यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई पोलीसांनी तीन आराेपींना अटक केली आहे. डीसीपी राजतिलक रोशन यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली की, या घटनेनंतर मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेची (क्राइम ब्रँच) सुमारे २० विशेष पथके स्थापन करण्यात आली होती. या पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि जमीनी स्तरावरील तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला.

डीसीपींनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणावरून पोलीसांना त्या मोटरसायकलचा शोध लागला, ज्याचा वापर तिन्ही आरोपींनी गुन्ह्यात केला होता. तपासात समोर आले की, आरोपी बाईकवरून रेल्वे स्थानकावर पोहोचले आणि तेथून पश्चिम रेल्वे मार्गाचा वापर करत सुरतच्या दिशेने रवाना झाले.

तपासादरम्यान पोलीसांना माहिती मिळाली की, आरोपी सुरतहून ‘पुणे-जयपुर एक्सप्रेस’ ट्रेनमध्ये बसून पुढे निघून गेले होते. यानंतर पोलीसांनी ट्रेनच्या डब्याशी संबंधित माहिती गोळा करून कोटा पोलीसांसोबत शेअर केली. या सूचनेच्या आधारे कोटा पोलीसांनी तिन्ही आराेपींना पकडण्यासाठी मदत केली. मुंबई पोलीसांचे पथक देखील आराेपींचा पाठलाग करत तिथे पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले.

डीसीपींनी माहिती दिली की, या प्रकरणी हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स कायद्यान्वये (Arms Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू असून, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचा खंडणी विरोधी पथक विभाग करत आहे.

सध्या तपास प्राथमिक टप्प्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आरोपींचे इतर संभाव्य संपर्क, या हल्ल्यामागील नेमका हेतू आणि शस्त्रे जप्त करण्याबाबत पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात इतर आरोपींची भूमिका समोर आल्यास त्यांच्यावरही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.
महाराष्ट्र पोलीस न्यूज हे सेंट्रल प्रेस जर्नालिस्ट असोसिएशन मध्ये संलग्न आहे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
अधिकृत वृत्त प्रतिनिधी
avdhoot13
महाराष्ट्र पोलीस न्यूज नेटवर्क आणि Central Press Journalist Association अधिकृत प्रतिनिधी.
बातमी आवडल्यास नक्की शेअर करा: Facebook
विशेष नोंद
महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत! Central Press Journalist Association संलग्न अधिकृत पोर्टल महाराष्ट्र पोलीस दलाच्या सकारात्मक, धाडसी व उल्लेखनीय कामगिरीचे एकमेव व्यासपीठ! मुख्य संपादक: संदिप कासळकर | उपसंपादक: सलाहुद्दीन शेख महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत! Central Press Journalist Association संलग्न अधिकृत पोर्टल महाराष्ट्र पोलीस दलाच्या सकारात्मक, धाडसी व उल्लेखनीय कामगिरीचे एकमेव व्यासपीठ! मुख्य संपादक: संदिप कासळकर | उपसंपादक: सलाहुद्दीन शेख
ताज्या बातम्या
लिंक कॉपी झाली!