महाराष्ट्र पोलीस न्यूज
महाराष्ट्र पोलीस न्यूज
सत्य, सुरक्षितता आणि निष्पक्ष बातमीदारी
महाराष्ट्र पोलीस न्यूज | प्रतिनिधी नेटवर्क
🆔 ओळखपत्र पडताळणी
महाराष्ट्र पोलीस न्यूज नेटवर्क
Central Press Journalist Association
Central Press
Journalist Association
महाराष्ट्र पोलीस न्यूज

महाराष्ट्र पोलीस न्यूज

MAHARASHTRA POLICE NEWS
AFFILIATED WITH CENTRAL PRESS JOURNALIST ASSOCIATION
Central Press Journalist Association
संलग्न संस्था Central Press
Journalist Association
Subscribe Channel
ब्रेकिंग न्यूज
महाराष्ट्र पोलीस विभागाशी संबंधित ताजी घडामोड, क्राईम रिपोर्ट आणि प्रशासकीय अपडेट्स...
मुख्यपृष्ठ / Breaking News

दिव्यातील आगासन गावात व्यावसायिकाच्या बंगल्यावर धाडसी दरोडा..

Tuesday, November 17, 2026 avdhoot13 CPJA Affiliated
⏱ २ मिनिटांत वाचा
फॉन्ट:
बातमी ऐका (Audio News)
मोबाईल शेप डिजिटल बातमी कार्ड (4:5 Format) व्हॉट्सॲप स्टेटस व सोशल मीडियावर शेअर करण्यासाठी १-क्लिकमध्ये डाऊनलोड करा!
शेअर करा: Facebook 𝕏
प्रतिनिधी: अवधुत सावंत

दिवा. दि. १७  -  दिवा शहरातील आगासन गावात व्यावसायिक तुकाराम मुंडे यांच्या बंगल्यावर अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. मध्यरात्री दोन ते पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूची खिडकी व ग्रील उचकटून घरात प्रवेश केला. यावेळी घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, दिवाळीच्या सुट्टीनिमित्त घरातील इतर सदस्य बाहेरगावी गेले होते. मात्र तुकाराम मुंडे हे बंगल्यातील बेडरूममध्ये झोपलेले होते. चोरट्यांना बेडरूमचा दरवाजा उघडता न आल्याने मोठा अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. संपूर्ण चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या प्रकरणात १० ते १२ संशयितांचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. चोरीचा सखोल तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथक आणि फॉरेन्सिक वाहनही घटनास्थळी दाखल झाली असून पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, दिवा शहर आणि परिसरात वाढत्या चोरी व गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र पोलीस यंत्रणेची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. दिव्यात नवीन पोलीस ठाण्याची इमारत उभी राहिली असली, तरी पोलीस ठाणे प्रत्यक्षात सुरू होण्याची दिवेकर नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत. स्वतंत्र पोलीस ठाणे सुरू झाल्यास परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र पोलीस न्यूज हे सेंट्रल प्रेस जर्नालिस्ट असोसिएशन मध्ये संलग्न आहे
महाराष्ट्र पोलीस न्यूज
अधिकृत वृत्त प्रतिनिधी
avdhoot13
महाराष्ट्र पोलीस न्यूज नेटवर्क आणि Central Press Journalist Association अधिकृत प्रतिनिधी.
बातमी आवडल्यास नक्की शेअर करा: Facebook
विशेष नोंद
महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत! Central Press Journalist Association संलग्न अधिकृत पोर्टल महाराष्ट्र पोलीस दलाच्या सकारात्मक, धाडसी व उल्लेखनीय कामगिरीचे एकमेव व्यासपीठ! मुख्य संपादक: संदिप कासळकर | उपसंपादक: सलाहुद्दीन शेख महाराष्ट्र पोलीस न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत! Central Press Journalist Association संलग्न अधिकृत पोर्टल महाराष्ट्र पोलीस दलाच्या सकारात्मक, धाडसी व उल्लेखनीय कामगिरीचे एकमेव व्यासपीठ! मुख्य संपादक: संदिप कासळकर | उपसंपादक: सलाहुद्दीन शेख
ताज्या बातम्या
लिंक कॉपी झाली!